देश

“महंगाई जेब कांटे, भाजपा देश बांटे”

नवी दिल्ली | काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी महागाईने आकाशाला गवसणी घातल्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. भाजप सरकारने लोकांचा खिसा कापून त्यांच्या पोटावर पाय दिला आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

भाज्या, तेल, डाळ आणि पिठाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून गरिबांनी काय खावं? असा प्रश्न करत लोकांच्या हातातील रोजगारही मंदीमुळे गेला आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

जुलै 2014 ला मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हा महागाई दर 7.39 टक्के होता. तोच दर आता डिसेंबर 2019 ला 7.35 टक्के इतका झाला आहे. कांदा 100 रुपये किलो विकला जात आहे. खाण्याच्या पदार्थाचे भाव 14.12 टक्यानी वाढला आहे. तसेच भाजीपाल्याचे दर 60 टक्क्यांहून अधिक झाले आहेत, अशी टीका पी. चिदंबरम यांनी आकडेवारीच्या आधारे केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महागाईच्या आकड्यांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. तसेच सातत्यानं ढासळणारी अर्थव्यवस्था चिंतेचा विषय बनली आहे, असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या – 

“मंत्र्यांच्या गाडीचे टायर बदलण्यापूर्वी हे सरकार बदलेल”

“मोदींनी देशातील विद्यार्थ्यांना सामोरं जाण्याची हिंमत दाखवावी”

मराठ्यांनी काय करावं ते पवारांच्या कुत्र्याने सांगू नये- निलेश राणे 

महत्वाच्या बातम्या – 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या