नवी दिल्ली | जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करुन टाकल्याचा आरोप काँग्रेसच्या सरचिटनीस प्रियांका गांधी यांनी केला आहे. भारताच्या आर्थिक वाढीचा दर गेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत घसरुन 4.5 टक्क्यांवर आला आहे.
शेतमालाला दुप्पट भाव, अच्छे दिन, दरवर्षी दोन कोटी रोजगाराची निर्मीती, अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन बनवण्याचे आश्वासन अशा लागोपाट केलेल्या घोषणांचे काय झाले? असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे. जीडीपीचा दर 4.5 टक्क्यावर आल्याने ह्या सर्व घोषणा खोट्या ठरल्याचे त्यांनी म्हटले.
हिंदीत केलेल्या ट्वीट मध्ये त्यांनी 26 महिन्यातील सर्वात कमी जीडीपी अशा आशयाची ओळ टाकून सोबत चिञ जोडले आहे. भारत देशाला विकासाची व अर्थव्यवस्थेला वाढीची इच्छा आहे. परंतु सरकारला त्यात अपयश आले आहे. असं त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, जनता दल (संयुक्त) नेते के. सी. त्यागी यांनी सुध्दा सरकारवर आरोप केला आहे. शहरातील वाढत जाणारी बेरोजगारी , कृषी क्षेञात आलेली मरगळ याबद्दल त्यांनी चितां व्यक्त केली.
वादा तेरा वादा…
2 करोड़ रोजगार हर साल,
फसल का दोगुना दाम,
अच्छे दिन आएँगे,
Make in India होगा,
अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन होगी…क्या किसी वादे पर हिसाब मिलेगा?
आज GDP ग्रोथ 4.5% आई है। जो दिखाता है सारे वादे झूठे हैं….1/2 pic.twitter.com/Y9BXWVa3k0
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 30, 2019
महत्वाच्या बातम्या –
“शरद पवारांशिवाय राजकारण अळणी आणि बेचव आहे”- https://t.co/7zxXMPPhQU @PawarSpeaks @rautsanjay61
— थोडक्यात (@thodkyaat) December 1, 2019
संजय राऊतांचं भाकित खरं ठरलं; 169 नाही तर ‘170’ खरा आकडा! https://t.co/cfzNLbiVlo @rautsanjay61 @ShivSena
— थोडक्यात (@thodkyaat) December 1, 2019
“पुन्हा येण्याची अती घाई त्यांना नडली”- https://t.co/9WjPq22DF0 @rautsanjay61
— थोडक्यात (@thodkyaat) December 1, 2019
Comments are closed.