बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप नेते आणि त्यांचे अब्जाधीश मित्र यांच्याशिवाय देशात कुणीही सुरक्षित नाही”

लखनऊ | लखीमपूरला काही दिवसांपुर्वी झालेल्या शेतकरी हत्येवरून मोदी सरकार आणि भाजपवर विरोधकांनी चांगलंच शरसंधान साधलं आहे. त्यातच आता प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात किसान न्याय रॅलीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर आणि मोदी सरकारवरही हल्ला चढवला आहे.

लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारात तब्बल 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यावर बोलताना या देशात फक्त भाजप नेते आणि त्यांचे अब्जाधीश मित्र हेच सुरक्षित आहेत, असा घणाघाती हल्ला त्यांनी वाराणसीत बोलताना भाजप नेत्यांवर केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

लखीमपूरला झालेल्या हिंसाचारात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक झाल्याने विरोधकांनी या प्रकऱणात निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे, असा पवित्रा घेतला आहे. तसेच यावरून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच पंतप्रधानांनी काही दिवसांपुर्वी लखनऊच्या एका प्रदर्शनाला भेट दिली.

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लखनऊवरून काही तासांवर असलेल्या लखीमपूरला मात्र पोहचू शकले नाहीत, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे सध्या लखीमपूर प्रकरण चांगलंच गाजत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! महाराष्ट्र बंदमुळे पुण्यातील PMPML प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

“लखीमपूरची चर्चा करूच पण इथल्या शेतकऱ्यांना मदत कधी देणार?”

चिंताजनक! मुंबईमध्ये पुन्हा कोरोना फोफावण्याचा धोका

राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे!

‘मी त्यालाही ओळखत नाही आणि कुठल्या अभिनेत्यालाही ओळखत नाही, पण…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More