Top News

प्रियांकांच्या लखनौमधील रोड शोला सुरूवात, रॅलीत पाय ठेवायलाही जागा नाही!

लखनऊ |  प्रियांकांच्या लखनौमधील रोड शोला सुरूवात असून, काँग्रेस कार्यकर्त्यांचा या रॅलीला तुफान प्रतिसाद मिळत आहे. रॅलीत पाय ठेवायलाही जागा नाही, अशी एकंदर स्थिती आहे.

दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रियांका गांधींचं लखनौ विमानतळावर आगमन झालं. त्यांच्या स्वागताला राज बब्बर, ज्योतिरादित्य सिंधीया हे काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते.

प्रियांकांच्या लखनौ येण्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. वाजत-गाजत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांकांचं स्वागत केल्याचं दिसून आलं.

दरम्यान, मी येतीय…. तुम्हाला भेटायला मी उत्सुक आहे, अशा आशयाचा मेसेज काल प्रियांकांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

प्रियांका गांधींची ट्विटरवर एन्ट्री; फॉलोअर्सचा तुफान प्रतिसाद

निवडणुकीआधीच ‘त्या’ 43 व्या जागेवर मुख्यमंत्री-पवार येणार आमने-सामने!

-उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रियांका गांधी?

आमच्या स्वभिमानावर हल्ला झाल्यास आम्ही सहन करणार नाही- चंद्राबाबू नायडू

राहुल गांधींना ‘आऊट’ करण्याची जबाबदारी माझ्यावर- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या