Top News

सगळं लखनऊ झालंय प्रियांकामय! उ. प्रदेशची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रियांका पहिल्यांदाच लखनऊमध्ये

लखनऊ |  काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्वचे सरचिटणीस म्हणून नुकत्याच राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियांका गांधी उत्तर प्रदेशची जबाबदारी स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच लखनौमध्ये येतायेत. त्यांच्या ‘फ्लेक्स’ने अवघं लखनौ ‘प्रियांकामय’ झाल्याचं पाहायला मिळतंय.

लखनौ विमानतळापासून ते काँग्रेस कार्यालयापर्यंत रोड शो करत यावेळी शक्तीप्रदर्शन होणार आहे. जागोजागी प्रियांकांच्या स्वागताचे बॅनर लागल्याचं बघायला मिळतंय.

प्रियांकांच्या लखनौ येण्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. त्यांच्या येण्याने काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत ‘प्रियांकास्त्र’ नेमकं काय कमाल करतं, हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

टी-20च्या रंगतदार सामन्यात भारताचा निसटता पराभव

-मी जे बोललो त्यात औचित्यभंग ते काय?- अमोल पालेकर

-यूपीएससी करणाऱ्यांसाठी खुशखबर; आता नापास झालात तरी मिळणार नोकरी!

…म्हणून भाषणं करतात काय, चोर कुठले!- पंकजा मुंडे

“चंद्राबाबू ज्यांना शिव्या देतात त्यांच्याच कुशीत जाऊन बसतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या