बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रियंका गांधी ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता!

नवी दिल्ली | येणाऱ्या काही महिन्यात देशातील प्रमुख राज्य उत्तर प्रदेशसह काही प्रमुख राज्यातील निवडणूका आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीत सत्तधारी भाजप विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालं आहे.

उत्तर प्रदेशची निवडणूक देशाच्या येणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महत्वाची ठरणार आहे. परिणामी उत्तर प्रदेश निवडणुकीवर सत्ताधारी आणि विरोधक यांचं लक्ष लागलं आहे. सपा, बसपा, आप, यांनी आपली तयारी चालू केली आहे. तर कॅंग्रेस पक्ष प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार आहे. प्रियंका गांधी या अमेठी किंवा रायबरेली यापैकी एका मतदारसंघातून 2024 लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

प्रियंका गांधी यांनी आतापासूनच उत्तर प्रदेशवर आपलं लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये काॅंग्रेसला मानहानिकारक पराभवाला समोरं जाव लागलं होतं. अमेठी या पारंपारिक मतदारसंघातून राहुल गांधी यांचा पराभव झाला होता. रायबरेली या सोनिया गांधी यांच्या मतदारसंघात काॅंग्रेसला विजय मिळवता आला होता.

प्रियंका गांधी या सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीची मोठी तयारी करत आहेत. त्यानी नुकताच रायबरेली आणि अमेठी मतदारसंघाचा दौरा केला आहे. यावरून प्रियंका गांधी या 2024 लोकसभेत  या दोन मतदारसंघापैकी कोणत्या तरी एका मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या 

…तर मला सामनाचं काम सोडावं लागेल- संजय राऊत

“मायबाप सरकार खरं बोला, पेगॅसस वापरलं की नाही?”

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढवलं

किरीट सोमय्या यांना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणात न्यायालयात हजर राहावं लागणार

“72 तासात माफी मागा अन्यथा, 100 कोटींचा दावा ठोकणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More