प्रियांकांनी घेतला तब्बल 16 तास नेत्यांचा ‘मॅरेथाॅन’ क्लास; प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची भांबेरी

लखनऊ | अलिकडेच राजकारणात सक्रिय झालेल्या काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांची तब्बल 16 तास मॅरेथाॅन बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या प्रश्नांमुळे अनेक कार्यकर्त्यांची भांबेरी उडाल्याचंही कळतय.

उत्तर प्रदेश पक्ष कार्यालयात त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी लोकसभा मतदारसंघातून आलेल्या नेत्यांचा चांगलाचं क्लास घेतला.

प्रियांका गांधी आगामी निवडणुकीसाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत असल्याचं दिसून येत आहे. रात्रभर सुरु असलेली बैठक सकाळी 5 वाजता संपली.

दरम्यान, मी लोकांचे मत ऐकून घेत आहे. येत्या काळात निवडणूक कशी लढायची याबाबत आराखडा तयार केला जात आहे, अशी प्रतिक्रिया प्रियांका यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

धोनिशिवाय कसं असेल क्रिक्रेटविश्व; आयसीसीनं केलं सुंदर काव्य!

-युती न झाल्यास शिवसेनेचं जास्त नुकसान; रामदास आठवलेंचं भाकित

कॅन्सर पीडिताला लाखोंचा गंडा घालणाऱ्या हाॅटेल मालकाला मनसेची ‘लाईव्ह’ मारहाण

-18 वर्षांपासून माझ्यावर बलात्कार, आता माझ्या मुलीवर नजर; राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यावर आरोप

“काँग्रेस आमच्या बरोबर आली असती तर ते 100 च्या पुढे गेले असते”