देश राजकारण

‘एका महिन्याच्या आत सरकारी बंगला सोडा’; प्रियांका गांधींना केंद्राची नोटीस

नवी दिल्ली | काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेट येथील सरकारी बंगला खाली करण्याची नोटिस बजावण्यात आली आहे. सरकारचा हा सूडाचा डाव असल्याचं आता काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रियांका गांधी भाजपचा गढ समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात शिफ्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लखनऊ मधील कौल हाऊस याठिकाणी त्या शिफ्ट होऊ शकतात. कौल हाऊस हे इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यांचं असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदाची धुरा आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या त्या प्रभारी देखील आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात पक्षाचा जनसंपर्क वाढवण्याचा त्या प्रयत्न करतील अशी माहिती समोर आली आहे.

काँग्रेस पक्षासाठी ही अत्यंत सकारात्मक बाब ठरणार आहे. कोरोनाच्या काळात त्यांचा युपीतील भेटीगाठी कमी झाल्या होत्या. आता सरकारला जशास तस उत्तर देण्यासाठी दिल्लीतून नव्हे तर लखनऊमधून त्या सक्रिय होतील, अशी माहिती आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

भाजपच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची बाधा

एनडीएसटीचे अध्यक्ष रामराव बनकर यांना एसीबीने ठोकल्या बेड्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या