Loading...

प्रियांका गांधींनी शब्द पाळला; पीडितांची भेट घेण्यासाठी आल्या सोनभद्रमध्ये!

वाराणसी | आज(मंगळवारी) काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सोनभद्रमध्ये जाऊन सामूहिक हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी सोनभद्रमध्ये भेटायला गेल्या असता त्यांना योगी सरकारने वाटेतच अडवलं होतं.

मागच्या वेळी भेटण्यापासून रोखल्यानंतर मी तुम्हाला भेटायला नक्की येईल, असा शब्द त्यांनी पीडित कुटुंबांना दिला होता. तो शब्द पाळत त्यांनी आज सोनभद्रमधल्या उभ्भा गावाला भेट दिली.

Loading...

सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून 10 गोंड आदिवासींची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर सगळा देश हळहळला होता. त्या पीडित कुटुंबियांची प्रियांका गांधींनी भेट घेऊन विचारपूस केली आहे.

दरम्यान, मी अन्याय झालेल्या कुटुंबासोबत आहे. त्यांच्या बाजूने उभं राहण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही, असं मागच्या वेळी अडवणूक केल्यानंतर प्रियांका गांधी यांनी म्हटलं होतं.

Loading...

काँग्रेसकडून करण्यात आलेलं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

Loading...

-सांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी; पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

-पुण्यातील शिक्रापूरमध्ये महिलेचा विनयभंग, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

-लवासामुळे निसर्गाचा मुडदा पडला- संभाजी भिडे

-आमदार महेश लांडगेंच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद!

-राज्यासाठी 6800 कोटी रूपयांची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार- मुख्यमंत्री फडणवीस

Loading...