बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तर प्रदेशची ‘कमान’ एकट्या प्रियांकांनी सांभाळली! राहुल गांधींवर प्रियांका पडल्या भारी

नवी दिल्ली |  काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार मोठ्या धुमधडाक्यात केला. मोदी-शहा-योगी या त्रिकुटाला प्रियांकांनी तितक्याच जोरदारपणे तोंड दिलं. राहुल गांधींनी उत्तर प्रदेशात तितकासा जोर लावला नाही मात्र प्रियांकांनी प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला.

प्रियांका गांधींनी 55 लोकसभा मतदारसंघात 40 सभा घेतल्या तर जवळपास तितकेच रोड शो केले. तर राहुल गांधींनी 20 सभा घेतल्या तर काही रोड शो केले.

काही मतदारसंघात प्रियांका गांधी दोन-दोन वेळा गेल्या. लोकांच्यात जाऊन त्यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे सांगितली. परंतू 15 लोकसभा मतदारसंघ असेही आहेत जिथे काँग्रेसचा उमेदवार असताना प्रियांका पोहचू शकल्या नाहीत.

प्रियांकांना जास्तीत जास्त उत्तर प्रदेशात प्रचाराला ठेवून राहुल यांची चाणाक्ष खेळी खेळली असल्याचं बोललं जात आहे. कारण उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक काँग्रेसला प्रियांकांच्या नेतृत्वात लढायची आहे.

महत्वाच्या बातम्या

-“निवडणुकीत हरलो तर अमित शहा जबाबदार… हेच मोदींना दाखवायचे होते”

-टाईम मासिकात मोदींचा ‘डिव्हायडर इन चिफ’ उल्लेख; त्यावर मोदी म्हणतात…

-निकालाआधी हाचचालींना वेग, चंद्राबाबू नायडूंनी घेतली शरद पवारांची भेट; प्लॅन ठरला??

-पत्रकार परिषद चालू असताना मोदी काय विचार करत होते?? काँग्रेस म्हणतंय…

-मायावती आखिलेश भाजपसोबत जाणार नाही; राहुल गांधींचा दावा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More