बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई करताना दिसल्या प्रियांका गांधी, पाहा व्हिडीओ

लखनऊ | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या लखीमपूरकडे निघाल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना हरगावमध्येच ताब्यात घेतलं आहे. त्यांना सीतापूरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे.

प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सीतापूर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं आहे. या गेस्ट हाऊसमध्ये हातात झाडू घेऊन साफसफाई करतानाचा प्रियांका गांधी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 45 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत प्रियंका गांधी एकट्याच दिसत आहे. संपूर्ण रुमखाली आहे. त्या या रुममध्ये झाडू मारताना दिसत आहेत.

प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. प्रियांका, मला माहीत आहे तू मागे हटणार नाहीस. तुझ्या हिंमतीमुळे ते तुला घाबरले आहेत. न्यायाच्या या अहिंसक लढाईत आपण देशातील अन्नदात्याला विजय मिळवून देऊच, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, यूपी काँग्रेसने ट्विट करुन लोकांना समर्थनासाठी या भागात पोहोचण्यास सांगितलं आहे. प्रियांका गांधींना ताब्यात घेऊन पोलीस त्यांना सीतापूर जिल्ह्यातल्या सिंधोली येथे घेऊन गेले आहेत, तिथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

शिवलीला पाटीलने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; चाहत्यांना मोठा धक्का

‘हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके जायेंगे’; खडसेंचा भाजपला इशारा

भारतातील लसीकरणाविषयी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

‘तुम्ही गैरसमज पसरवू नका’; नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीवरून अजित पवारांनी फडणवीसांना सुनावलं

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं ‘या’ मोठ्या कंपन्या करणारं वर्क फ्रॉम होम पूर्णपणे बंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More