प्रियांका गांधी राजकारणात; 2019 ची निवडणूक लढणार?

रायबरेली | सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर मुलगी प्रियांका गांधी राजकारणात येणार असल्याचं कळतंय. 2019 ची निवडणूक त्या रायबरेली लोकसभा मतदार संघातून लढवतील, अशी चर्चा आहे. 

प्रियांका राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा वेळोवेळी झडत आलेल्या आहेत. 2014 साली त्या रायबरेली मतदारसंघातून लढतील, अशी चर्चा होती. मात्र राजकारणातील प्रवेशाचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं होतं. 

दरम्यान, आता सोनिया गांधी यांनी निवृत्ती घेणार असल्याचं म्हटलंय. शिवाय राहुल यांच्या खांद्यावर काँग्रेसची धुरा आलीय, त्यामुळे त्यांच्या मदतीला त्यांची बहीण येणार का? हे पाहणं औत्युक्याचं ठरेल.