बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लसीचा शस्त्र म्हणून नाही तर, वैयक्तीक प्रचारासाठी वापर’; प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली | कोरोनामुळे सध्या देशात बिकट परिस्थिती उद्भवली आहे. केंद्र सरकारने भारतात लसीकरण मोहिम हाती घेतली होती. परंतू आता लसीकरणासाठी लसीचा तुटवडा जाणवू लागल्यानं लसीकरण मोहिम थंडावली आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे.

प्रियंका गांधी यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. ‘लसीवर आता फक्त मोदींचा फोटो आहे. पण सर्व जबाबदारी मात्र राज्यांवर देण्यात आली. आता राज्याचे मुख्यमंत्री लसींच्या तुटवड्यावर केंद्र सरकारला सूचना देत आहेत. देशभरात लसीचा तुटवडा जाणवत आहे, याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना संसर्गाच्या सुरवातीला भारतात सामान्यांचे जीव वाचवण्यासाठी लसीचा शस्त्र म्हणून उपयोग करायला पाहिजे होता. मात्र त्याचा वैयक्तीक प्रचारासाठी वापर केला गेला. लसीकरणाच्या स्तरावर जागातील कमकुवत देशांच्या यादी भारताचा समावेश झाला आहे. हेच आजचे कटू सत्य आहे. असं का झालं?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला आहे.

प्रियंका गांधी यांनी 3 प्रश्न अधोरेखित केले आहेत –

1. सरकारने गेल्या 1 वर्षांपासून लसीकरणाचं नियोजन केलं होतं. मग जानेवारी 2021 मध्ये 1 कोटी 60 लाख लसींच्या डोसची ऑर्डर का दिली गेली?

2. सरकारने भारतीय नागरिकांना कमी लस देऊन, लसीचे अधिक डोस हे विदेशात का पाठवले?

3. भारत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. पण आज दुसऱ्यांच्या देशांकडून लस मागण्याची वेळ का आली? आणि तेही मोठी कामगिरी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न का केला जात आहे?

असे प्रश्न प्रियंका गांधी यांनी फेसबुक पोस्टद्वारे उपस्थित केले आहेत.

पाहा पोस्ट-

थोडक्यात बातम्या-

तरुण सरपंचाने करुन दाखवलं, काहीच दिवसांत गाव कोरोनामुक्त, पण पॅटर्न काय वापरला पाहा…!

वादग्रस्त पु्स्तकावरून लेखक गिरीश कुबेर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक

शरद पवारांचं नरेंद्र मोदींना पत्र; केली ही महत्वाची मागणी

उसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाचा कोरोनाने मृत्यू!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More