बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेश निवडणुकीआधी प्रियंका गांधींचा मोठा निर्णय

लखनऊ | आगामी काळात देशात प्रमुख पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Vidhan Sabha Elections) होणार आहेत. परिणामी प्रत्येक पक्षानं निवडणुकीची तयारी चालू केली आहे. देशाच्या सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) जातो असं सर्वत्र बोलंल जातं. परिणामी 6 महिन्यावर येऊन ठेपलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरात आहे. काॅंग्रेसच्या सर्व तयारीची सुत्र महासचिव प्रियंका गांधी (Congress Leader Priyanka Gandhi) यांनी आपल्या हातात घेतली आहेत.

प्रियंका गांधी यांनी आपल्या प्रचाराच्या केंद्रस्थानी महिलांना ठेवलं आहे. उत्तर प्रदेशात ज्या ज्या ठिकाणी महिलांवर अन्याय होत आहेत त्या ठिकाणी प्रियंका गांधी दौरा करत आहेत. महिलांना 40 टक्के तिकटं देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय गांधी यांनी घेतला आहे. इतकच नाही तर शाळेतील मुलींना मोफत स्कुटी वाटप, टॅब वाटप करण्याचं आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिलं आहे.

काॅंग्रेसचं सरकार उत्तर प्रदेशात आल्यावर महिलांना मोफत बसचा प्रवास दिला जाणार आहे. वर्षात महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत पुरवण्याचा निर्णय गांधी यांनी घेतला आहे. महिलांना नोकरीमध्ये देखील 40 टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिलं आहे. इतकच नाहीतर बलात्कारासारख्या घटनेत 10 दिवसांच्या आत कारवाई नाही झाली तर पोलीस उपनिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करण्याचं आश्वासन महिलांना दिलं आहे.

दरम्यान, 2017 विधानसभेच्या निवडणुकीत काॅंग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणुक लढवली होती. मात्र भाजपच्या झंझावातापुढं सपा आणि काॅंग्रेस पुर्णपणे कोलमडले होते. प्रियंका गांधी यांच्या उत्तर प्रदेशच्या राजकारणातील सक्रियतेमुळं भाजप आणि सपा यांना त्या थेट लढत देणार आहेत.

थोडक्यात बातम्या 

“छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश राज्य शासनानं थोर महापुरुषांच्या यादीत करावा”

omicron मुळे मृत्यूचा धोका किती?; दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला; मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा उधान

मोठी बातमी! तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, सीडीएस बिपीन रावतही जखमी?

अंबानींची दर्यादिली; सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स अव्वल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More