“प्रशांत किशोर काॅंग्रेसमध्ये येणार होते पण…”, प्रियंका गांधींचा सर्वात मोठा खुलासा
नवी दिल्ली | देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी चालू आहे. गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर या पाच राज्यातील विधानासभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. अशात आता सर्व पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे. काॅंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशसह देशाच्या राजकारणावर देखील भाष्य केलं आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर हे काही दिवसांपूर्वी काॅंग्रेसच्या वाटेवर होते, अशी चर्चा देशभर रंगली होती. पण काही कारणांनी त्यांचा पक्षप्रवेश टळला. परिणामी या विषयावर बोलताना प्रियंका गांधी यांनी प्रशांत किशोर हे काॅंग्रेसमध्ये येण्यास इच्छूक होते पण काही गोष्टींवर सहमती झाली नसल्याचं म्हटलं आहे.
प्रशांत किशोर आणि काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात बऱ्याचदा चर्चा झाली, पण शेवटी दोन्हीकडील काही गोष्टींवर एकमत झालं नसल्याचं गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या काॅंग्रेसमध्ये सामिल न होण्यास अनेक कारणं होती. त्यांच्याकडून आणि आमच्याकडून या विषयावर अनेक चर्चा झाल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, प्रशांत किशोर यांनी 2014 लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींची मदत केल्यामुळं त्यांना काॅंग्रेसमध्ये घेण्यात आलं नसल्याची चर्चा राजकारणत रंगली होती.
थोडक्यात बातम्या –
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
मोदींच्या मंत्र्याचा अजब कारभार! दार बंद करून केली अधिकाऱ्याला मारहाण
KL Rahul ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; रक्कम ऐकून थक्क व्हाल!
“…म्हणून भाजपला दु:ख होतंय”, जयंत पाटलांचा खोचक टोला
“नाना पटोले मिस्टर नटवरलालच्या भूमिकेत, त्यांच्यामुळं सोनिया गांधी…”
Comments are closed.