नंदुरबार | प्रियांका गांधीची पहिली सभा महाराष्ट्रातल्या नंदुरबार येथे व्हावी म्हणून काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात नंदुरबारला एक वेगळचं स्थान आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला आणि आदिवासी मतदारांत इंदिरा गांधींचा प्रभाव असलेला मतदारसंघ म्हणून नंदुरबारची ओळख आहे. त्यामुळे प्रियांका गांधीची पहिली सभा नंदुरबारमध्येच व्हावी यासाठी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माणिकराव गावित हे सलग 9 वेळा निवडून गेले आहेत. परंतू गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या नवख्या उमेदवार हीना गावीत यांनी पराभव केला होता.
दरम्यान, प्रियांका गांधीनी काही दिवसांपूर्वीच सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
–तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर; पुणे पोलिसांना न्यायालयाने फटकारले
–“…तर ही अण्णांची आत्महत्या असेल”
–राष्ट्रवादीला मोठा धक्का; 13 नगरसेवकांनी पक्ष सोडला!
-परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच बंड
–लग्नाला न आलेले ‘मनसैनिक’ अमित-मितालीला शुभेच्छा देण्यासाठी ‘कृष्णकुंज’च्या दिशेने!