बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! प्रियंका गांधींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

लखनऊ | उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी पक्षाचा चेहरा असतील असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीत महिलांना 40 टक्के तिकिटे देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे, अशी घोेषणा प्रियंका गांधी यांनी केली. त्या मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होत्या. काँग्रेस पक्षाचा उत्तर प्रदेश प्रभारी म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

मी एक मुलगी आहे, मी लढू शकते, असा काँग्रेस पक्षाने नारा दिला आहे, असं प्रियंका गांधी यांनी सांगितलं. यावेळी बोलताना प्रियंका गांधी यांनी महिला पत्रकार, समाजसेविका तसेच इतर सेवांशी संबधित महिलांनी राजकारणात यायला हवं, असं आवाहन देखील केलं आहे.

तिकीटे देतांना महिलांच्या गुणवत्तेनुसार दिली जातील, असंही प्रियंका गांधी यांनी सांगितलं आहे. जाती आणि धर्माबाबतच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत असंही त्यांनी म्हटलं आहे. निवडणुकीसाठी इच्छुक महिला त्यांच्या विधानसभेतून अर्ज करू शकतात, अशी माहिती प्रियंका गांधी यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात महिला उच्च स्थानी दिसतील, असंही प्रियंका गांधी यांनी सांगितलं.

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी महिलांना अधिक तिकीटे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर पक्षांवर दबाव वाढला आहे. भाजपच्या प्रवक्त्या अनिला सिंह यांनी प्रियंका गांधी यांनी जी घोषणा केली आहे. ती चांगली गोष्ट आहे, मात्र त्यांच्या कृतीत  आणि बोलण्यात किती साम्य आहे हे पाहावं लागेल, असं अनिला सिंह म्हणाल्या आहेत.

 थोडक्यात बातम्या- 

दोन वर्षात शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? निलेश राणेंची शरद पवारांवर जळजळीत टिका

‘तुम्ही पेट्रोल मला द्या ना…’, पेट्रोलपंपावर गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

‘या’ वर्षीही भेटणार वाहतूक करात सवलत?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

विमानाचा रंग पांढराच का असतो?, ‘हे’ आहे त्यामागचं विशेष कारण

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी राहणार पाणीपुरवठा पुर्णपणे बंद

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More