प्रियांका-निकच्या वयाबद्दल प्रियांकाच्या आईने केलं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

Priyanka-Nick | प्रियांका चोप्रा-निक जोनस (Priyanka-Nick) हे हॉलिवूडमधील चर्चेत असणारं कपल आहे. प्रियंका-निक (Priyanka-Nick) ही जोड नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. प्रियंका आणि निक जोनसच्या वयातील फरकाची अनेकजण खिल्ली उडवतात. तर कधी कधी मिम्स देखील सोशल मीडियावर शेअर होताना दिसत आहेत. सध्या प्रियंका ही 41 वर्षांची आहे. तसेच निक हा 31 वर्षांचा आहे. याच वयावरून प्रियांका चोप्राची आई मधू चोप्राने दोघांच्या वयातील फरकाला घेऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मधू चोप्रा या मुलाखतीत बोलत असताना त्यांना दोघांच्या वयातील फरकाबाबत प्रश्न करण्यात आला होता. त्यावर आता मधू चोप्राने आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोघांच्या वयाला घेऊन कधीच कुटुंबात कोणतीही चर्चा झाली नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.

नेमकं काय म्हणाल्या मधू चोप्रा?

मधू चोप्रा यांनी मुलाखतीत बोलत असताना सांगितलं की, “आम्हाला त्यांच्या वयाचा तसा काहीच फरक पडला नाही. मुलगा चांगला आहे. मुलगी चांगली आहे. ते एकमेकांची काळजी घेतात. तसेच एकमेकांचा आदर करतात यापेक्षा अधिक काय हवंय? असं मधू चोप्रा म्हणाल्या आहेत. किंबहुना आमच्यात याआधी चर्चा देखील झाली नव्हती. मी त्या दृष्टीकोनातून पाहिलंच नाही. मी खूश होते. बाकी ज्यांना बोलायचं आहे त्यांना बोलू द्या”, असं मधू चोप्रा म्हणाल्या आहेत. यावेळी बोलत असताना आणखी एक किस्सा सांगितला. (Priyanka-Nick)

मधूने निक जोनाससोबतचा किस्सा देखील सांगितला आहे. जेव्हा प्रियंका कामात व्यस्त होती तेव्हा निक मधू यांना जेवायला घेऊन गेला होता. त्यावेळी निकने मधू यांना आपल्या मुलीसाठी आपण कसा मुलगा पाहत आहात?, असा सवाल केला होता. त्यावर मधू यांनी आपलं मत निकला दिलं होतं.

मधू यांनी सांगितला निक जोनसचा किस्सा

प्रियंका आपल्या कामात व्यस्त होती. तेव्हा निकने मला लंचसाठी नेलं होतं. त्यावेळी मला त्याने विचारलं होतं की तुमच्या मुलीसाठी कसा मुलगा हवा आहे? तेव्हा मी त्याला सर्व गुण सांगितले होते. ते ऐकून निकने माझा हात त्याच्या हातात धरला होता, म्हणाला मी तसाच मुलगा आहे. मी तुमच्या मुलीशी लग्न करू शकतो का? मी वचन देतो की तुम्ही जे गुण सांगितले आहे की तुम्ही जे वचन दिलं आहे त्याकडे मी कधीच दुर्लक्ष करणार नाही असं निक म्हणाला आहे.

1 डिसेंबर 2018 रोजी निक-प्रियंकाने (Priyanka-Nick) ख्रिश्चन धर्म आणि हिंदू परंपरेनुसार लग्न केलं. निकने सर्वात 2016 मध्ये ट्विटरला प्रियंकाला मेसेज केला होता. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठींना सुरूवात झाली. 2017 मध्ये दोघं समोरासमोर पहिल्यांदा भेटले होते. 15 जानेवारी 2022 रोजी प्रियांका आणि निकने (Priyanka-Nick) सरोगसीच्या माध्यमातून चिमुकल्या पाहुणीचं स्वागत झालं.

News Title – Priyanka-Nick Between Different Age About Madhu Chopra Statement

महत्त्वाच्या बातम्या

मासिक पाळीदरम्यान ‘या’ अभिनेत्रींना होतो प्रचंड त्रास; केली मोठी मागणी

कॅशबॅकपासून बिल भरण्यापर्यंत, या 4 बँकांनी बदलले क्रेडिट कार्डचे नियम; काय परिणाम होणार?

कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

या राशीच्या व्यक्तींनी आज भांडणात सहभाग घेऊ नका

..तर तुम्हीही ठरू शकता उष्माघाताचे बळी; ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी