श्रीदेवीच्या भूमिकेत दिसणार प्रिया प्रकाश वारियर, पाहा सिनेमाचा टीझर

श्रीदेवीच्या भूमिकेत दिसणार प्रिया प्रकाश वारियर, पाहा सिनेमाचा टीझर

नवी दिल्ली | आपल्या नजरेनं देशभरातील तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आता अभिनेत्री श्रीदेवीच्या  भूमिकेत दिसणार आहे.

‘श्रीदेवी बंगलो’ हा चित्रपट दिवंगत श्रीदेवी यांच्यावर आधारित आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाचं दिग्ददर्शन प्रशांत माम्बुली यांनी केलं असून अभिनेता प्रियांशु चॅटर्जी मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. 

‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटाची कथा स्त्रीप्रधान आणि वेगळ्या धाटणीची असल्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला. हा चित्रपट श्रीदेवींच्या जीवनावर आधारित आहे की नाही हे प्रेक्षक ठरवतील, असं प्रियाने सांगितलं आहे.

दरम्यान, ‘ओरु अदार लव्ह’ हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं निधन

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी तब्बल १ हजार झाडं कापली! 

-आता व्हॉट्स अ‌ॅपवरही शेड्युल करता येणार मेसेज

-विरोधात जाणाऱ्यांना आडवं करण्याची ताकद आमच्या पक्षात आहे- रावसाहेब दानवे

-“सीबीआय आणि ईडी हे तर भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष”

Google+ Linkedin