कोरेगाव भीमा प्रकरणी चौकशी आयोगाने मुख्यमंत्र्यांचे जबाब नोंदवावेत!

पुणे | कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात मुख्यमंत्र्यांना चौकशी आयोगासमोर बोलवून त्यांचे जबाब नोंदवावेत, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. कोरेगाव-भीमा प्रकरणी त्यांनी चौकशी आयोगासमोर आपली बाजू मांडली.

मला घटनेची माहिती मिळताच मी पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला. मात्र पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना यासोबतच पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन या घटनेला जबाबदार आहे, असं आंबेडकरांनी सांगितलं. 

दरम्यान, पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात विरोधाभास असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार

-जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू!

-संघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही!

-महाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का?; शिवसेनेचा सरकारला सवाल

-राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल