बंगळुरू । पुणेरी पलटणनं प्रो कबड्डी लीगच्या 79 व्या सामन्यात यूपीचा 44-38 असा पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला. नितीन तोमरच्या नेतृत्वावर पुणेरी पलटणने युरी योध्दाचा सहा गुणांनी पराभव केला. रेडर्स मोहीत गोयत आणि अस्लम उनामदार यांनी पुण्यासाठी उत्तम कामगिरी केली.
या विजयासह पुणेरी पलटनचा संघ मोसमातील आठव्या स्थानावर पोहचला असून, पुण्याने लीग मधील सातवा विजय नोंदवला आहे. तर युपीचा हा सहावा पराभव असून युपी संघ सातव्या स्थानावर कायम आहे.
बंगळुरू येथे खेळलेल्या पुणेरी पलटणने पूर्वार्धानंतर युपी योध्दा विरूध्द 21-18 गुणांची आखाडी घेतली आणि दोन्ही संघानी 13-13 गुण मिळवले, तर पुण्याने टॅकलद्वारे दोन गुणही मिळवले. दरम्यान मोहीत गोयतनेही त्याचा सुपर 10 पूर्ण केला.
सुरेंदर गिलने पुन्हा एकदा मल्टी पाॅइंटने चढाई केली, पुणेरी पलटनच्या बचावफाळीने निर्णायक क्षणी युपी योध्दाच्या तीन रेडर्सना बादकरून संघाला निश्चित केले. शेवटच्या क्षणी पुणेरी पलटणने हा सामना जिंकून सलग तिसरा विजय मिळवला.
थोडक्यात बातम्या –
‘…सगळ्यांनी मिळून हे षडयंत्र रचलं होतं’; 12 आमदार निलंबनप्रकरणी फडणवीसांचा हल्लाबोल
मोठी बातमी! नितेश राणे न्यायालयासमोर शरण, म्हणाले…
भाजपच्या आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर राऊतांची नाराजी, म्हणाले….
राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्र ‘मास्क फ्री’ होणार का?, ठाकरे सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Comments are closed.