अभिनेता सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; पोलिसात तक्रार दाखल

Sunny Deol | बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलवर चित्रपट निर्माता सौरव गुप्ता यांनी अत्यंत गंभीर आरोप केले असून त्याच्या विरोधात थेट पोलिस तक्रार दखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 2016 मधील प्रकरणामुळे आता सनी देओल अडचणीत सापडला आहे.

सनी देओलने चित्रपट करण्याच्या नावाखाली अॅडव्हान्स पैसे घेतले होते. त्यानंतरही तो चित्रपट लवकरच करू असं म्हणत पैसे घेत होता, पण त्याने आपल्याबरोबर कोणताही चित्रपट केला नाही, असा आरोप सौरव गुप्ताने केलाय.

सनी देओलवर निर्मात्याचा गंभीर आरोप

काही मीडिया रिपोर्टनुसार, सौरव गुप्ताने 2016 मधील प्रकरण आता उघड केलंय. या निर्मात्याने काही आरोपही केले आहेत. चित्रपट करण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“आम्ही सनी देओलला 1 कोटी रुपये ॲडव्हान्स दिले, पण चित्रपट सुरू करण्याऐवजी त्याने 2017 मध्ये पोस्टर बॉयचं शूटिंग सुरू केलं. तो सतत पैसे मागत राहिला. आतापर्यंत आम्ही सनीच्या (Sunny Deol) खात्यात 2.55 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. त्याने मला दुसऱ्या दिग्दर्शकालाही पैसे देण्यास सांगितलं. तसेच मला फिल्मिस्तान स्टुडिओ बुक करून एक कार्यकारी निर्माता घेण्यासही सांगितलं,” असा खुलासा या निर्मात्याने केला आहे.

सनी देओलविरोधात तक्रार दाखल

इतकंच नाही तर, सनी देओलने 2013 साली आपल्या कंपनीबरोबर बनावट करार केल्याचा आरोपही निर्माता सौरव गुप्ताने केला आहे. “1996 सालचा ‘अजय’ चित्रपटाचे हक्क परदेशात वितरणासाठी सनीने घेतले होते. त्याने याचे देखील बाकीचे पैसे दिले नाही.”, असा आरोपही या निर्मात्याने केलाय.

या आरोपांमुळे आता सनी देओल (Sunny Deol) अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी निर्मात्याने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौकशीसाठी सनीला समन्स बजावले आहे. सनीने यावर अद्याप उत्तर दिलेलं नाही.

News Title –  Producer Sourav Gupta cheating allegations against Sunny Deol

महत्त्वाच्या बातम्या-

“मोदी पंतप्रधान होणार नाहीत, लोकांनी केवळ स्टंट म्हणून त्यांच्याकडे पाहावं”

ऐश्वर्या नाही तर ‘या’ अभिनेत्रीसाठी सलमानने तोडली होती ‘नो किसिंग पॉलिसी’

लग्नाच्या 4 वर्षानंतर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री घेणार घटस्फोट?

“माझा जीव गेला तरी दु:ख करू नका, माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या”

ऐश्वर्याचे ‘ते’ फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल, लाईक्सचा पडला पाऊस