Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्वाची योजना असून श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात या योजनेतील पात्र महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे. हा सोहळा दिनांक 17 ऑगस्ट रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे संपन्न होणार आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. तसेच, विभागीय आयुक्तालय, पुणे येथे बैठक घेऊन नियोजनाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) शुभारंभ सोहळ्याप्रसंगी वाहन पार्किंग व्यवस्था, जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था अशा सर्व बाबी नीटनेटक्या असाव्यात यासाठी अदिती तटकरे यांनी संबंधितांना सूचना दिल्या.
यावेळी खा. श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, महिला बालकल्याण आयुक्त प्रशांत ननावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संतोष पाटील व व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींकडून उदंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १ कोटी ४४ लाख ३६ हजार ०५९ महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. या अर्जांची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून १ कोटी ३३ लाख १७ हजार ०१० महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तसेच, योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रायोगिक चाचणीही घेण्यात आली असून थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे” अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना सर्वप्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देतानाच त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
विधान परिषद उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, प्रशासनाने महिलांना सर्वप्रकारच्या योजनांचे लाभ द्यावे, तसेच पात्र महिला लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्क्रीनवर आपले कपडे काढून…’; Aishwarya Rai चा सर्वात मोठा खुलासा
राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
“माझ्या त्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत”, प्राजक्ता माळीचा सर्वात मोठा खुलासा!
राहासोबत रणबीर कपूरच्या सासूने केलं असं काही… सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल!
मराठा आंदोलनाला मोठा धक्का! अचानक प्रकृती खालावली, जरांगे पाटलांचा धक्कादायक फोटो