देश

“लॉकडाउनचा कालावधी वाढला तर लाखो भारतीय गरीबीच्या चक्रात फसतील”

नवी दिल्ली | लॉकडाउनचा कालावधी वाढला तर लाखो भारतीय गरीबीच्या चक्रामध्ये अडकू शकतात’ अशी शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर दुव्वूरी सुब्बाराव यांनी व्यक्त केली.

कोरोना व्हायरसचे संकट संपल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा ‘व्ही’ शेपमध्ये येईल. अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगली सुधारणा दिसून येईल, अशी अपेक्षा सुब्बाराव यांनी व्यक्त केली आहे.

विकासाचं चक्र पूर्णपणे थांबलं आहे. मागच्यावर्षी विकास दर पाच टक्के होता. कल्पना करा, मागच्यावर्षी पाच टक्के आणि यावर्षी निगेटिव्ह किंवा शून्य विकास दर राहिला तर विकास दरात थेट पाच टक्क्यांची घसरण नोंदवली जाईल, असं सुब्बाराव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारत या संकटकाळात चांगली कामगिरी करणार हे खरं आहे. पण ही समाधानकारक बाब नाही. कारण आपला देश गरीब आहे. हे संकट असेच राहिले किंवा लॉकडाउन उठवला नाही तर, लाखो लोक गरीबींच्या चक्रामध्ये अडकू शकतात, असं सुब्बाराव म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाउन कुठे कडक आणि कुठे शिथिल करणार?; नरेंद्र मोदींनी केलं स्पष्ट

किशोरीताई, तुम्ही खरा आदर्श निर्माण केला आहे- धनंजय मुंडे

पत्ते खेळणं पडलं महागात; 40 जणांना झाली कोरोनाची बाधा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या