मोठी बातमी! शिवसेना नेते यशवंत जाधव यांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त
मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काही नेत्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केल्यानंतर शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आयकर विभागाच्या (Income Tax Department) रडारवर आले आहेत.
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्या आहेत. यशवंत जाधव यांचे भायखळ्यातील बिलखाडी चेम्बर्स इमारतीतील तब्बल 31 फ्लॅट्स आणि वांद्रे येथील 5 कोटी किमतीचा फ्लॅट अशी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे.
आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरी आणि मालतमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यानंतर आता आयकर विभागाने मोठी कारवाई करत यशवंत जाधव यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ईडीकडून (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) आणखी एका नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
थोडक्यात बातम्या-
“संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नाही तर शरद पवारांचे समर्थक”
पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाले?, वाचा एका क्लिकवर
राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?”, नारायण राणेंचा शिवसेनेला सवाल
कोरोनानंतर नव्या व्हायरसचा धुमाकूळ; ‘या’ आजाराची लक्षणंही कोरोना सारखीच
Comments are closed.