बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वात मोठी बातमी! औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर

मुंबई | गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत होता. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत होती. मात्र, अखेर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे 3 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर व उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे. औरंगाबादच्या नामांतराची चर्चा गेल्या 20 वर्षांपासून सुरू होती.

दरम्यान, राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे 3 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारची ही शेवटची कॅबिनेट बैठक आहे अशी चर्चा होत असताना मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तोपर्यंत फ्लोअर टेस्ट होऊ नये’, शिवसेनेचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

बहुमत चाचणीचा फैसला आज होणार, राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना न्यायालयात

एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार आज गोव्यात दाखल होणार, राजकीय हालचालींना वेग

सुरक्षेशिवाय अजित पवार दोन तास गायब, मंत्रिमंडळात खळबळ…

संजय राऊत आजपासून बोलणं बंद करणार, कारण सांगत म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More