Top News विदेश

अशी ही बनवाबनवी!!! ‘एक्स’ची अंगठी चोरुन केलं ‘नेक्स्ट’ला प्रपोज

Photo Courtesy- Pixabay

वॉशिंग्टन | आज व्हेलेंटाईन डे… प्रेम व्यक्त करण्याचा दिवस… प्रेम व्यक्त करण्यासाठी कुणी काय करेल याचा अंदाज कुणालाही बांधता येऊ शकत नाही. अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातील एका इसमानं जे केलंय, ते वाचून त्याच्या प्रेयसीच्या पायाखालची जमीन तर सरकली.

जोसेफ डेव्हीस असं या ४८ वर्षीय इसमाचं नाव आहे. त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो मात्र फरार झाला आहे. आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी त्याने चक्क पहिल्या गर्लफ्रेंडची अंगठी चोरल्याची तक्रार त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर त्याने तीचे काही दागिने चोरल्याचाही आरोप आहे.

ही घटना तेव्हा उजेडात आली जेव्हा संबंधित महिलेने आपली अंगठी दुसऱ्या महिलेच्या हातात पाहिली. तीही तीने सोशल मीडियावरील फोटोत पाहिली. त्यानंतर तीने स्वतःचे दागिने तपासले असता त्यातील काही दागिने गायब होते. संबंधित महिलेनं त्या महिलेचं घर गाठलं तेव्हा त्यानं तिलाही फसवल्याचं समोर आलं.

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तो दुसऱ्या गर्लफ्रेंडला पहिलीच्या घरी देखील घेऊन गेला होता, तेव्हा ती घरी नव्हती. तेव्हा त्यानं दुसऱ्या गर्लफ्रेंडला हे स्वतःचंच घर असल्याचं सांगितलं होतं. आता पोलीस या इसमाचा शोध घेत आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील ‘या’ उड्डाणपुलाचे काम वर्षभरात संपवा; नितीन गडकरींचे सक्त आदेश

…नाहीतर काम उखडून फेकीन; पुण्यात नितीन गडकरींची कंत्राटदाराला तंबी!

व्हॉट्सअप ग्रुपद्वारे ओळख, मग महिलेकडून पैसे घेतले, नंतर पैसे देण्याच्या बहाण्याने…

पूजा चव्हाण प्रकरणात आम्हाला येत आहेत ‘या’ अडचणी- पोलीस

कोरोनामुळे महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या