बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, तिथं चाललेला प्रकार पाहून पोलिसही हादरले!

पुणे | अनेक स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती काही दिवसांपुर्वी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानंतर अनेक शहरांमध्ये तसेच राज्यांमध्ये पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये जाऊन छापा टाकला. यावेळी अनेक वेश्या व्यवसायांचा पर्दाफाश झाला होता. अशातच आता पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील एका स्पामध्ये चालत असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे.

पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी भागात ‘ग्रीन व्हिलेज’ स्पा सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी छापा मारुन तेथील चार तरुणींची सुटका केली आहे. तसेच तेथील मुख्य दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यात स्पाचा मालक दीपक साळुंखे आणि अमित काटे या दोन आरोपींना सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतलं आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने पिंपरीतील अनेक बार आणि लाॅजवर देखील छापा मारला. यावेळी जगताप डेअरी परिसरातली अॅलो गॅस्ट्रो लाॅज आणि एटीन डिग्री रुफ टाॅप हाॅटेल अँड बारवर पोलिसांनी धाड टाकली. यात पोलिसांनी 200 पेक्षा अधिक तरुण-तरुणींना अटक केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी छत्तीसगड येथील एका माॅलमधील स्पावर पोलिसांनी छापेमारी केली होती. यावेळी पोलिसांना स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचं अढळलं. एवढंच नाही तर यावेळी अनेक तरुण-तरुणी अश्लील अवस्थेत देखील सापडले होते.

थोडक्यात बातम्या-

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलिसांनी किरीट सोमय्यांना रेल्वेतून उतरवलं, राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता

…म्हणून पोलीस आयुक्तांनी मानले पुणेकरांचे आभार!

पहिला घोटाळा बाहेर काढताच दवाखान्यात गेले, दुसरा काढला तर….- किरीट सोमय्या

किरीट सोमय्यांना कोल्हापूरच्या वेशीवरच अडवलं जाणार?, जिल्हा प्रशासनाने दिले जमावबंदीचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More