बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडखोर आमदारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले…

मुबंई | एकनाथ शिदेंच्या बंडानंतर शिवसेनेला उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचदरम्यान आदित्य ठाकरे यांनी आता दहिसर येथे निष्ठायात्रा केली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदाराना लाज असेल, हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असं वक्तव्य केलं होतं. आदित्य ठाकरेंच्या टीकेला

2019 साली जनतेने भाजप-शिवसेना युतीला मत देत कौल दिला होता. मात्र आपणच संघाशी-असंघ करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. त्यामुळे आता आम्ही काहीच चुकीच केलं नाही. त्यामुळे लाज वाटण्याचा काहीच संबध नाही. आम्ही शिवसेना आता सोडणार नाही, असं वक्तव्य करत भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युतर दिलं.

शिदें यांनी 40 आमदारांना सोबत घेत बंड केलं. महाविकास आघाडी सरकारकडून विकास कामासाठी निधी मिळत नसल्याच्या आणि हिदुत्वांच्या विचारांची फारकत होत असल्याचा आरोप आमदारांनी केला. यानंतर शिवसेनने एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. शिंदेंनी काही मागण्या ठाकरेंसमोर ठेवल्या त्या शिवसेनेनं (Shiv Sena) मान्य न केल्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

एकनाथ शिदेंच्या बंडानंतर आता शिवसेनेसमोर एक मोठं आव्हान आहे. शिवसेना आता कमजोर झाली आहे. शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी शिवसेनेनं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

थोडक्यात बातम्या

शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज, म्हणतात…

श्रीलंकेचे गायब झालेले राष्ट्रपती गोटाबायांनी उचललं मोठं पाऊल, अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिवसेना संतप्त, शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर

कोट्यवधींचं घर खरेदी करत रणवीर-दीपिका झाले शाहरूखचे शेजारी, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल

पर्यटनासाठी जाणार असाल तर जरा थांबा, ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More