कोल्हापूर महाराष्ट्र

बिळात न बसता विरोधकांनी पीपीई कीट घालून कोरोना वॉर्डात जावं- हसन मुश्रीफ

कोल्हापूर | कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना आंदोलन करणाऱ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे. आंदोलनं करून बिळात लपून बसण्यापेक्षा कोरोना वॉर्डात पीपीई कीट घालून विरोधकांनी जाऊन यावं, असं म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज आर्सेनिक एल्बम गोळ्या, जिल्हा परिषद सदस्यांना टॅब वाटप करण्यात आले. शासकीय विश्रामगृह येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या काळात महाविकासआघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. तरी देखील विरोधक आंदोलनं करत आहेत. मात्र ही वेळ आंदोलनाची आणि टीका टिप्पणीची नसून सरकारला सहकार्य करण्याची आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील हे अतिउत्कृष्ट काम आहेत. त्यामुळे त्यांना बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

“जगात काहीही अशक्य नसतं…” धोनीच्या निवृत्तीवर सुप्रिया सुळेंची खास प्रतिक्रिया

धोनी कर्णधार होण्यामागे शरद पवारांचा होता हात, आव्हाडांनी सांगितलेलं ते टॉप सिक्रेट पुन्हा चर्चेत!

लालपरीची जिल्हाबंंदी उठणार; सरकारचा महत्वपुर्ण निर्णय येण्याची शक्यता!

“पालकमंत्री बदलणं पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखं नाही”

‘आयसीसी’नं महेंद्रसिंग धोनीसाठी ट्विट केला खास व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या