बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिमानास्पद! पुण्याच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम करत 3 रेकाॅर्ड बुकमध्ये नोंदवलं नाव

पुणे | जागतिक स्तरावर रेकाॅर्ड बनवणाऱ्या अनेकांविषयी आपण ऐकलं असेल मात्र आता चक्क चार वर्षाच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम केला असल्याचं समोर येत आहे. एवढंच नाहीतर जगातील तीन प्रमुख रेकॉर्ड बुकनं तिच्या नावाची नोंद केली आहे.

पुणे जिल्ह्यातील मंचर येथील चार वर्षाच्या ईशान्वी बाळासाहेब आढळराव पाटीलनं अवघ्या तीन मिनिट दहा सेकंदात 195 देशांचे ध्वज पाहून देशाचं नाव आणि राजधानी सांगितली आहे. यामुळं या चिमुकलीनं जागतिक विक्रम रचला आहे.

दुबईत पार पडलेल्या जागतिक स्पर्धेत ईशान्वीनं हा विक्रम आपल्या नावे केला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड या तीन रेकॉर्ड बुकमध्ये तिचा हा विक्रम नोंदला गेला आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मंचर येथील एका छोट्याशा गावातील रहिवासी असणाऱ्या चार वर्षाच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम केल्यानं पुणे आणि महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली आहे. इशान्वीची आई नीता आढळराव पाटील यांनी म्हटलं की, अत्यंत लहान वयात तिने डोंगराएवढी कामगिरी केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! चोरीच्या भितीने लेकरांच्या पायात साखळी बांधून लावलं कुलूप

‘वडिलांच्या वयाच्या व्यक्तीकडून सलाम घेतेस, लाज वाटत नाही का?’, कियारा झाली ट्रोल

“…तर मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसी यांचा DNA एकच”

‘रेमडेसिवीरनंतर आता महाराष्ट्रात ‘बर्नोल’ची मागणी वाढतीये खासकरून…’; नितेश राणेंची जहरी टीका

“भाजपने आमचे आभार मानावेत; मोदींच्या मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना-राष्ट्रवादीचाच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More