बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाने आई, वडिल आणि भावाचा मृत्यू; घरी न जाता रुग्णांची सेवा करत राहिली महिला डॉक्टर

नवी दिल्ली | कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. यात  डाॅक्टर, पोलीस, पत्रकार यांचाही समावेश आहे. मात्र डाॅक्टर, पोलीस, पत्रकार, असे अनेक लोक आपल्या कामाला प्रथम स्थान देत आहेत. अशात मुळच्या बिहारच्या असलेल्या महिला डाॅक्टरच्या आई, वडिल आणि भावाचा कोरोनाने मृत्यू झाला. मात्र यादरम्यान या डाॅक्टर आपल्या परिवाराकडे न जाता रुग्णांची सेवा करत राहिल्या.

संबंधित महिला डाॅक्टरचं नाव स्वप्ना असं आहे. स्वप्ना यांचा विवाह झाला असून त्यांना दोन मुलं आहेत. स्वप्ना यांचे पती देखील कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात स्वप्ना यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यानंतर आठ दिवसांपुर्वी त्यांच्या आईचा देखील मृत्यू झाला. तसेच आयटी कंपनीमध्ये एचआर असलेल्या स्वप्ना यांच्या भावाला देखील सात दिवसांपुर्वी कोरोनाने संपवलं.

कुटुंबातील लोकांच्या मृत्यू दरम्यान स्वप्ना कोरोना रुग्णांच्या सेवेत होत्या. या कारणामुळे त्या कोणालाच शेवटचा निरोप देण्यासाठी घरी गेल्या नाहीत. याबाबत बोलताना या महामारीच्या काळात रुग्णांवर उपचार करणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र पती-पत्नी दोघेही रुग्णांच्या सेवेत असल्यामुळे मुलांची काळजी वाटतं असल्याचं देखील त्या म्हणाल्या.

दरम्यान, आता स्वप्ना यांना त्यांच्या कुटुंबासह घरात क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तसेच स्वप्ना यांचे वडिल देखील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी काम करत होते.

थोडक्यात बातम्या-

‘परिस्थिती गंभीर होत चाललीये, आतातरी काहीतरी करा’; 100 शास्त्रज्ञांचं मोदींना पत्र

कोरोना झाला असतानाही रोहित सरदाना करत होते ‘ही’ महत्त्वाची मदत, शेवटचे तीन ट्विट चर्चेत!

“आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?”

मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी कोरोनामुळे निधन

“कोरोना तर संपला” असं म्हणणाऱ्या भाजप आमदाराचं कोरोनाने निधन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More