बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिमानास्पद! मंगळावर उडणाऱ्या हेलिकॅाप्टरचं नियंत्रण भारतीयाकडे!

नवी दिल्ली | अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या इतिहासामध्ये 19 एप्रिल ऐतिहासिक दिवस ठरला आहे. मंगळ ग्रहावर पाठवण्यात आलेला नासाचा हेलिकॉप्टर इंजिन्युटीने या दिवशी पहिल्यांदा यशस्वी उड्डाण केलं आहे. पहिल्यांदाच मंगळावरील हेलिकॉप्टरला पृथ्वीवरून नियंत्रित केल्याचा हा ऐतिहासिक क्षण होता. या मोहिमेमागे अमेरिकेचे नागरीकत्व स्वीकारलेले भारतीय अभियंते डाॅ. बाॅब बालाराम होते.

बालाराम नासाच्या जेट प्राॅपल्शन लॅबमध्ये काम करतात. त्यांनीच इंजिन्युटी हेलिकॉप्टर  बनवले आहे. सहा वर्षांच्या मेहनतीनंतर तयार करण्यात आलेल्या या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं होतं. डाॅ. बालाराम नासाच्या मंगळ हेलिकॉप्टर मोहिमेचे मुख्य अभियंते आहेत.

इंजिन्युटी हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावरील जेजेरो क्रेटरमध्ये तयार करण्यात आलेल्या एका तात्पुरत्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतलं होतं. पृथ्वीशिवाय इतर ग्रहावर पहिल्यांदा हेलिकॉप्टर उडाले आहे. नासाच्या इंजिन्युटीने जवळपास 1.8 किलोच्या रोटरक्राफ्टने आपल्या चार कार्बन फायबर पातींच्या आधारे उड्डाण घेतले. या पाती प्रति मिनिटाला 2500 वेळा फिरतात. हा वेग पृथ्वीवर असलेल्या हेलिकॉप्टरच्या पातींच्या रोटेटिंग वेगापेक्षा जवळपास पाचपट अधिक आहे. मंगळावरील वातावरण पृथ्वीच्या तुलनेत 100 पट अधिक हलकं असल्यामुळं पातींच्या क्षमता अधिक आहेत.

दरम्यान, डाॅ. बालाराम यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मी लहान असताना टीव्ही नव्हता तेव्हा फक्त ऐकले होते की, चंद्रावर पहिल्यांदाच माणूस गेला आहे. तेव्हाच संकल्प केला की मला अंतराळ अभियंता व्हायचं आहे. नासामध्ये 35 वर्षापासून मी कार्यरत आहे, आणि मंगळावर हेलिकॉप्टर उडवणं तसचं होतं जसं राईट बंधूंनी पहिल्यांदाच विमान उडवलं होतं.

थोडक्यात बातम्या

ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत आम्ही पाया देखील पडायला तयार- राजेश टोपे

महाराष्ट्राला 20 कोटी लस मिळणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदर पुनावालांशी चर्चा

‘या समाजाचा भाग असल्याची लाज वाटते’; उच्च न्यायालयानं ठाकरे सरकारला फटकारलं

मेकअप खराब होईल म्हणून मास्क न लावणं नवरीला पडलं चांगलंच महागात!

“भाजपमधील राजकीय शुक्राचार्यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More