बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिमानास्पद! जागतिक पातळीवर पुण्याची उल्लेखनीय कामगिरी, ‘या’ स्पर्धेत गाठली अंतिम फेरी

पुणे | कोरोना महामारीशी लढा देताना अनेक मोठं मोठ्या शहरांची कंबरडी मोडली आहेत. अशा परिस्थितीत अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी करणाऱ्या शहरांसाठी जागतिक पातळीवर ‘ग्लोबल 2021 मेयर्स चॅलेंज’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पुणे शहराची निवड झाली आहे.

ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रोपीजच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी 99 देशांतील तब्बल 631 शहरांनी अर्ज केले होते. जगभरातील 631 शहरांमधून पुणे शहराने पहिल्या 50 शहरांत आपलं स्थान निश्चित केलं आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी जून 2021 ते ऑक्टोबर 2021 दरम्यान होईल. सध्या निवड झालेल्या 50 शहरांमधून 15 शहरांची अंतिम निवड होईल.

‘ग्लोबल 2021 मेयर्स चॅलेंज’ या स्पर्धेसाठी पुणे शहराने ‘सर्व इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण पाया’ ही योजना सादर करण्यात आली होती. या योजनेतील हवामान आणि वातावरण या घटकाअंतर्गत पुण्याची निवड झाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अंतिम फेरीसाठी पुण्याची निवड झाल्याने ब्लूमबर्गचे आभार मानले आहेत.

दरम्यान, या स्पर्धेत अंतिम निवड होणाऱ्या 15 शहरांना त्यांच्या संकल्पनांची अंमलबजावणी करण्यासाठी भरभक्कम तांत्रिक साहाय्य देण्यात येणार आहे. आता पुणे महानगरपालिका गरजूंचे मूल्यमापन करेल. यानंतर योजनेतील कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे हे निश्चित करण्यासाठी काही कार्यशाळांचं देखील आयोजन करेल.

थोडक्यात बातम्या – 

“शिवसेना भवन आमचं श्रद्धास्थान, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार”

दैव देतं पण कर्म नेतं! राणू मंडलला उद्धपटणा पडला महागात, आता अशा प्रकारे जगते जीवन

मोदींना खोटं बोलण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळायला हवा- दिग्विजय सिंह

वाह रे पठ्ठ्या! ‘या’ मराठमोळ्या मुलाने इन्स्टाग्रामवरील ती कमी दाखवली अन् कंपनीने दिले 22 लाख रुपये

ब्रेकींग! शिवसेना भवनासमोर आंदोलनात भाजप-सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More