बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! नवविवाहीत जोडप्याने आहेराच्या पैशातून केलं गरिबांना धान्य वाटप

मुंबई | जिद्द असेल तर गरिब माणूस देखील गरिबाची मदत करु शकतो. अशातच एका तरुणाने अभिमानास्पद कामगिरी केली असून त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. प्रभादेवी येथील एका तरुणाने लग्नातील आहेराच्या पैशांमधून गरिबांना धान्याचं वाटप केलं आहे.

गेले 50 दिवस प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाच्या माध्यमातून गरीब-गरजूंना अन्नाचे दोन घास लागावेत म्हणून प्रफुल्ल गावडे धडपडत होता. अन्नदान केलं तरी ते कमीच होतं. लोकांची मागणीही धान्याचीच असायची. अशात ती पूर्ण करण्याची क्षमता ना मंडळाची होती ना प्रफुल्ल गावडेची. त्यामुळे धान्यदान करता येत नव्हतं. मात्र गरजूंना किमान 15 दिवसांचं तरी धान्य द्यायचं हा विचार त्यांच्या मनात सारखा घोळत होता.

दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेकदा लांबणीवर पडलेल्या प्रफुल्लच्या लग्नाची तयारीही जोरात सुरू होती. मित्रांचा लाडका असलेल्या प्रफुल्लला त्याच्या गरजेची महत्त्वाची वस्तू आहेर म्हणून देण्याची तयारी त्याचे मित्र करत होते. ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांच्या भावस्पर्शी मनाला हे खटकलं. माझ्यापेक्षा अधिक गरज त्या असंख्य गरीब-गरजू कुटुंबांना आहे, ज्यांच्याकडे खाण्यासाठी दोनवेळचे अन्नही नाही.

दरम्यान, मला आहेर नको, तेच पैसे तुम्ही गरीबांच्या मुखी अन्नाचे दोन घास लागावेत म्हणून धडपडणाऱ्या आपल्या मंडळाच्या उपक्रमासाठी वापरावेत, अशी इच्छा प्रफुल्लने व्यक्त करून त्याच पैशातून गरीब कुटुंबियांना धान्यदान करा, असं देखील सांगितल. दिवसभर चाललेल्या लग्नाच्या सर्व विधी आणि स्वागत समारंभानंतर सायंकाळी गावडे दाम्पत्यांनी गरीब कुटुंबांना धान्यदानाचे वाटप करून त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळवत आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली.

थोडक्यात बातम्या-

आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट; 15 वर्षांचा संसार मोडला

समुद्राच्या मध्यभागी उडाला आगीचा भडका; आग विझवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; महापौरांनी दिली ही महत्वाची माहिती

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

‘दोन्ही डोसमुळे मृत्यूचा धोका 98 टक्क्यांपर्यंत कमी, तर एक डोसमधून…’; केंद्र सरकारची माहिती

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More