बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी सरकारने काय पूर्वतयारी केली, याचा तपशील सादर करा”

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे मोठ्याप्रमाणात आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याचं भयावह चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने उपचाराअभावी नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. तसेच तज्ज्ञांकडुन आता भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्याचा थेट परिणाम लहान मुलांवरही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तिसरीला थोपवण्यासाठी काय पूर्वतयारी केली आहे, याचा तपशील देण्याचे आदेश दिले आहेत.

लहान मुलांपासून सर्वांचं लसीकरण मोठ्या संख्येने करण्यात यावं आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलावीत. याबरोबरच, कोरोनाची तिसरी लाट येणारच आहे, असे गृहीत धरून तिचा सामना करण्यासाठी सरकारने योग्य पद्धतीने नियोजन करावं असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती एम.आर शहा यांनी म्हटलं आहे.

नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट भारतात धडकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच सर्व लोकांचं लसीकरण होणं गरजेचं असल्याचं मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ बंगळुरूचे डॉ. गिरीश बाबू यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

संगमनेरमध्ये जमावाचा पोलिसांच्या गस्त पथकावर हल्ला ; पाहा व्हिडीओ

“दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता?”

सोने-चांदीच्या किंमतीत मोठी दरवाढ; जाणून घ्या नवे दर

“अशोक चव्हाण यांना कायदा कळत नाही, वेड पांघरून पेडगावला जात आहे”

मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याकडून ‘ही’ खुशखबर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More