भारताचा स्टार फलंदाज पृथ्वी शाॅला दुखापत; भारताची चिंता वाढली

भारताचा स्टार फलंदाज पृथ्वी शाॅला दुखापत; भारताची चिंता वाढली

सिडनी |  भारताचा आस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना 6 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. पण त्यापूर्वी आस्ट्रेलियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या सराव सामन्यात भारताचा स्टार फलंदाज पृथ्वी शाॅ याला दुखापत झाली आहे.

आस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅक्स ब्रायंट याचा झेल पृथ्वीने टीपला. पण चेंडू फेकताना त्याचा पाय घसरला आणि त्याच्या घोट्याला इजा झाली.

भारतीय संघाचा मेडिकल स्टाफ तेथे लगेच पोहोचला. त्याच्यावर प्राथमीक उपचार करण्यात आले. मात्र, सुधारणा होत नसल्याने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं.

दरम्यान, पृथ्वी शाॅ जर अॅडिलेड मध्ये खेळू शकला नाही तर हा भारतीय संघासाठी मोठा झटका असू शकतो.

महत्वाच्या बातम्या-

-जे मराठा मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं!

-बंजरंगबली दलित होते; योगींचा नवीन जावईशोध!

-धनगर आरक्षणाचा अहवाल येऊन 3 महिने झाले, तरी एटीआर का नाही?

-अवघ्या 5 रुपयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची संधी!

-मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आक्रमक; विधेयकाच्या प्रती जाळल्या!

 

Google+ Linkedin