मुंबई | भाजप सरकार घालवण्याची जबाबदारी काँग्रेसलाच पार पाडावी लागेल, असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते सातारा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
चव्हाण यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्र सरकार सरकारी कंपन्या विकून चालवले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था अगदीच कोलमडली आहे. तसेच तरुणांचे भविष्य अंध:कारमय झाले आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.
चव्हाण यांनी दिल्ली हिंसाचार प्रकरणावरही भाष्य केलं. दिल्लीतील दंगलीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात असल्याचा दाट संशय आहे. या जोडगोळीने देशाची प्रतिमा धुळीस मिळवली, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.
दिल्ली जळत असताना पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आदरातिथ्य करत होते. अमित शहा यांनीही आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, असं ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
“भाजपला संपवण्याची तयारी सुरू झाली आहे”
शिवसेना पक्ष नंबर वन राहिला पाहिजे- अजित पवार
महत्वाच्या बातम्या-
…तोपर्यंत आम्ही जनतेचे वकील म्हणून काम करू- देवेंद्र फडणवीस
“पंतप्रधान कार्यालयातील हिंदुत्वविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात”
“पोंक्षे, औषध वेळेवर घेत चला, डोक्यावर परिणाम होतोय”
Comments are closed.