बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अर्थसंकल्पात 35 हजार कोटींची तरतूद असताना कोरोनाच्या लसीसाठी 250 रुपये का?”

मुंबई | काेराेना लसीकरणाचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून सुरू झाला हाेता. आता दुसरा टप्पा साेमवार 1 मार्चपासून सुरू झाला आहे. लस घेण्यासाठी पात्र असलेले नागरिक खासगी रुग्णालयातून काेराेनाची लस टाेचून घेऊ शकतात. त्यासाठी 250 रुपये एका डाेसचे शुल्क निश्चित केले आहेत. यावरून काँग्रसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेसाठी अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एवढी मोठी तरतूद केलेली असताना सामान्य नागरिकांकडून लसीकरणासाठी 250 रुपये आकारण्याची गरज काय?, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी दिलेल्या अर्थसंकल्पीय भाषणानुसार लसीकरण मोहिमेसाठी 35 हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत. एवढ्या रकमेमध्ये दीड अब्जाहून अधिक डोस विकत घेता येतील आणि 75 कोटी लोकसंख्येचे लसीकरण करता येईल. म्हणजेच भारतातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण अर्थसंकल्पीय तरतुदीतून करता येणं शक्य आहे, असं असताना केंद्र सरकार सर्वसामान्यांकडून शुल्क का घेत आहे?, असा चव्हाण म्हणाले.

दरम्यान, अमेरिका, इंग्लंड किंवा कॅनडासारख्या मोठ्या देशांमध्ये सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे. यासाठी त्या देशांमध्ये असलेल्या विमा योजन आणि अर्थसंकल्पीय तरतुदीचा आधार घेतला जात आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना (आयुष्मान-भारत) मोफत कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकार केली आहे.

थोडक्यात बातम्या-

धोनीच्या चेन्नईला मोठा झटका, हा निर्णय बसणार चेेन्नईच्या जिव्हारी?

धक्कादायक! सातवीतल्या मुलीने गळफास घेत संपवलं आपलं जीवनॉ

डुकराचा बड्डे! या चिमुकलीची कल्पनाशक्ती पाहून सोशल मीडियावर सारेच हैराण, पाहा व्हिडीओ

बाप की सैतान?, ब्लेडने गळा कापून पित्याने केली आपल्या चिमुकलीची हत्या

“माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More