Loading...

देवेंद्र फडणवीस यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेने भाजपला बहुमत नाकारले- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई |  सत्तास्थापनेचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेने भाजपला बहुमत नाकारले, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पाच वर्षात भाजप सरकारने एकही पायाभूत काम केले नाही. राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे. पण आम्ही सरकारस्थापनेच्या दाव्याविषयी आताच काही बोलणार नाही, असं ते म्हणाले.

Loading...

कौल पाहता शिवसेना-भाजपने सरकार स्थापन करायलं हवं. पण सद्य परिस्थितीत आम्ही राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी सध्याच्या पेचप्रसंगावर चर्चा केली आणि राज्यपालांच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...