…तर राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी जेलमध्ये जातील; पृथ्वीराज चव्हाणांना विश्वास

औरंगाबाद |  काँग्रेसची सत्ता आली की राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी जेलमध्ये जातील, असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

य़ा अगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही राफेल प्रकरणी मोदी जेलमध्ये जातील, असं वक्तव्य केलं होतं. पृथ्वीराज चव्हाण भाडिपाच्या ‘लोकमंच’ या कार्यक्रमात बोलत होेते.

राहुल गांधींचा गरिबी हटावचा नारा खूप महत्वाचा आहे. सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न होणे आवश्यक असून काँग्रेस त्यासाठी प्रयत्नशील आहे, असं चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.

नव्या रोजगारासाठी नव्या उद्योगधंद्यांना चालना देणं आणि त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, असंही चव्हाण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

-माढ्यात राष्ट्रवादीने साधलं टायमिंग! या बड्या नेत्याने दिला जाहीर पाठिंबा

-राज ठाकरे आणि आमचा पक्ष निवडणुकीत एकत्र नाही- शरद पवार

-‘भाजप-मनसे’त जुंपली ! राज ठाकरेंच्या आरोपांना भाजप देतंय त्यांच्याच स्टाईलने उत्तर

-कांचन कुल यांच्या प्रचारासाठी गेले अन् रिकाम्या खुर्च्यांपुढे भाषण करुन आले!

-“मुख्यमंत्र्यांची अवस्था म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे”