मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत. समृद्धी महामार्गात मोठा घोटाळा झाला असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी सभागृहात सांगितलं आहे.
अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीच जमिनी कशा खरेदी झाल्या? तसेच तत्कालिन मुख्यमंत्री यांनी ही चौकशी गुंडाळली, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. समृद्धी महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ झालेला पहायला मिळाला.
समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँकेकडून 4 हजार कोटी कर्ज घेतलं होतं. खुल्या बाजारात 7:3 टक्के दराने कर्ज मिळत असताना बँकेला 9:74 दक्के व्याज देण्यात येत आहे. हा मोठा घोटाळा आहे. सरकारने त्याची चौकशी करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्ग हा फडवणीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई ते नागपूर असा महामार्ग असून तो फायबर ऑप्टिकलने युक्त राहणार असून या महामार्गाच्या बाजूलाच औद्योगिक कॉरीडॉरही तयार करण्यात येणार आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
…तर शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील- देवेंद्र फडणवीस
देशाला अस्वस्थ करणारी ही दृश्यं तुम्ही पाहिली का?
महत्वाच्या बातम्या-
वारीस की लावारीस त्याला सोडणार नाही; देवेंद्र फडणवीस आक्रमक
अमित शहांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- सुप्रिया सुळे
आज वो हुए मशहूर जो काबिल न थे…- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.