मुंबई | काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय घाडामोडींना मोठा वेग आलेला दिसून येत आहे. विखेंच्या नंतर पुढचे विरोधी पक्षनेते कोण?? यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधी पक्षनेते पद कुणाकडे जाईल हे आत्ताच सांगता येत नाही. विखे गेल्यावर काँग्रेसच्या आमदारांची संख्या किती राहिल, त्यावरून पुढील निर्णय घेण्यात येईल, असं चव्हाण म्हणाले. यावरून हे पद राष्ट्रवादीकडेसुद्धा जाऊ शकतं, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील काही आमदारांना सोबत घेऊन भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. हिच शक्यता पकडून पृथ्वीराज चव्हाणांनी विरोधी पक्षनेतेपदाविषयी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे विखे आता 27 तारखेला काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-आघाडीचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा- देवेंद्र फडणवीस
–मुख्यमंत्र्यांच्या अल्बमसाठी 500 रूपये द्यायची ‘या’ तरूणाची इच्छा
-शहीद हेमंत करकरेंचे सहकारी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढवणार
-पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या आज महाराष्ट्रात सभा
– “लोकांच्या शिव्यांचा कचरा माझ्या खात्यात टाका मी त्यापासून खत बनवतो आणि कमळ फुलवतो”
Comments are closed.