मुंबई | भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र सरकारला कृषीविषयक कायदे करण्याचा अधिकार नसल्याचा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
सांगलीत काँग्रेसने कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
फक्त कोरोनामुळे देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला नाही. तर, कोरोना महामारीच्या आधीपासून केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करुन राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. पण कितीही प्रयत्न केला तरी काँग्रेस संपणार नाही, असं चव्हाण म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र सरकारला मोठा झटका; अर्णब गोस्वामींबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिले ‘हे’ आदेश
“फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला, कागदोपत्री सिद्ध करुन दाखवणार”
दम असेल तर… मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं योगी आदित्यनाथांना ओपन चॅलेंज!
मोठ्या आवाजांच्या फटाक्यांवर कायमची बंदी आणावी; सत्यजीत तांबेंची पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी
“अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी क्लोज करणाऱ्यांची चौकशी व्हावी”