Loading...

“नरेंद्र मोदी आले तरी उदयनराजे दोन लाखांनी पडणार”

सातारा | अमित शाह दुय्यम फलंदाज असून मोदी-शाह आले तरी उदयनराजे पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. कराडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाहांवर टीकास्त्र सोडलं.

Loading...

मी लोकसभेचा उमेदवार असतो तरीही आणि आता श्रीनिवास पाटील आहेत तरीही ते दोन लाख मतांनी जिंकणार आहेत. उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत, असा दावा चव्हाणांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्रात येऊन इथल्या प्रश्नावर न बोलता कलम 370 वर बोलणाऱ्या अमित शहांनी काश्मीरबाबत अभ्यास करावा, असा सल्लाही पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाहांना  दिला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

 

Loading...