राज्यातली पाटबंधारे महामंडळ बरखास्त करण्याची गरज – पृथ्वीराज चव्हाण

औरंगाबाद | पाणी सोडण्यावरुन होणारा वाद टाळण्यासाठी राज्यामध्ये असणाऱ्या पाटबंधारे महामंडळांचं एकत्रीकरण करून नदीखोरे अभिकरणात रूपांतर करण्यात यावं, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसंच सरकारला 4 वर्षे पुर्ण होत आहेत या आनंदात दुष्काळ जाहीर करण्याच्या तारखेचा विसर पडला की काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्यातला दुष्काळ आणि जायकवाडी धरणात पाणी साेडण्यावरुन झालेला वाद यामुळे अधिवेशनात पाण्याच्या प्रश्नावर व्यापक चर्चा होईल, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, एक दिवस उशिरा दुष्काळ जाहीर केल्यानं केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी साशंकता व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून धोनीला टी-20 मधून वगळलं; विराटचा मोठा खुलासा

-व्हीडीओ व्हायरल; राज्यवर्धन राठोड आणि मेरी कोममध्ये मुष्टीयुद्ध

-#MeToo | एम. जे. अकबर यांनी माझ्यावर बलात्कार केला होता!

-सुरक्षारक्षक असूनही भाजप नेत्याची आणि त्यांच्या भावाची गोळ्या झाडून हत्या!!!

-भाजपच्या चिंतेत भर टाकणारी बातमी; राहुल गांधी आणि चंद्राबाबू एकत्र