लखनऊ | उत्तर प्रदेशमध्ये एका लेडी पीएसआयने आपल्या भाड्याच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आरजू पवार असं आत्महत्या केलेल्या लेडी पोलीस अधिकारीचं नाव आहे.
आरजू पवार यांच्या खोलीमधून एक पत्र मिळालं असून त्यामध्ये, हे माझ्या कर्माचे फळ आहे, असं लिहिलेलं आहे. त्यांनी आपल्या मृत्युला स्वत:लाच जबाबदार ठरवलं असलं मात्र तरी पोलीस कसून तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील अनूप शहर पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडली आहे. आरजू पवार ज्या खोलीमध्ये रहात होत्या तेथील मालकाने त्यांना सात वाजता जेवणासाठी बोलावलं होतं. मात्र बराच वेळ झाल्यानंतर घरमालकाने त्यांच्या घरात डोकावून पाहिलं तर त्यांना पवार यांनी गळफास लावल्याचं दिसलं.
दरम्यान, आरजू पवार 2015 च्या बॅचच्या सब इन्स्पेक्टर होत्या. त्या शामली येथे रहात होत्या. त्यांनी नक्की कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.
थोडक्यात बातम्या-
“भाजपची लस घेऊ शकत नाही, त्यांच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी
“तेव्हा शिवसेना गोट्या खेळत होती का?”
“राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार”
मुकेश अंबानींना मोठा धक्का; सेबीने रिलायन्सला ठोठावला 25 कोटींचा दंड