कोल्हापूर | विवाह झाल्यानंतर संसारिक जबाबदाऱ्या पेलत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अश्विनी जाधव-डवरी यांनी पीएसआर्यच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचं कौतुक होत आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे या गावात त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं तर माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात घेतलं. त्यानंतर त्यांनी बी. ए. इतिहास करत असताना स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली.
2012 मध्ये नवनाथ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. नवनाथ यांनी त्यांना अभ्याससाठी प्रोत्साहान दिलं. अश्विनी यांनी देखील सगळी मेहनत पणाला लावून अभ्यास सुरू केला. त्यांच्या जिद्द आणि मेहनतीमुळे त्यांना पीएसआयच्या परीक्षेत चांगलं यश मिळालं आहे.
दरम्यान, अश्विनी यांना पहिल्यांदा मुख्य परीक्षा उत्तीर्ण हौोण्यास अपयश आले होते मात्र खचून न जाता त्यांनी परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. आणि अखेर आताच्या निकालात त्यांनी बाजी मारली. त्यांचं यश नवोदित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना प्रेरणादायी ठरत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!
“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे
महत्वाच्या बातम्या-
लग्न करू शकता बरं का… लग्न समारंभावर बंदी नाही- पुणे जिल्हाधिकारी
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचं जनतेला आवाहन
Comments are closed.