देश

प्रसारभारतीकडून ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला इशारा; मुलाखत ठरली वादाचं कारण

नवी दिल्ली | चीनी राजदूत सून विडोंग यांची मुलाखत घेतल्यानं अडचणीत आलेल्या पीटीआय या वृत्तसंस्थेला आता प्रसार भारतीकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या मुलाखतीतून राष्ट्रविरोधी वार्तांकन केल्याचा ठपका ठेवत पीटीआयचं सबस्क्रिप्शनही रद्द करण्याचा निर्णय प्रसारभारती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चीनी राजदूत सून विडोंग यांची २५ जून रोजी पीटीआयने एक मुलाखत घेतली. गलवान खोऱ्यातील हिंसक झडपेसाठी सून यांनी या मुलाखतीतून भारताला जबाबदार धरलं. यामुळे राजदूतांची मुलाखत घेऊन राष्ट्रविरोधी कृत्य केल्याची नाराजी व्यक्त करत प्रसारभारतीने याआधीच पीटीआयला पत्र पाठवलं आहे.

पीटीआय प्रसार भारतीच्या नियंत्रणाखालील दूरदर्शन व आकाशवाणी या संस्थांनाही सेवा पूरवत आहे. तसेच प्रसारभारतीकडून पीटीआयला वर्षागणिक ६.७५ कोटी रूपयांची भरभक्कम वार्षिक वर्गणीही पुरवली जाते. मात्र आता या नव्या वादामुळे पीटीआयला आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, पीटीआय ही भारतातील सर्वात जुनी वृत्तसंस्था म्हणून ओळखली जात आहे. या घटनेवर चीनी राजदूतांच्या मुलाखतीची केवळ एक बाजूच चीनी दूतावासाकडून प्रसारित करण्यात आली आहे. असं पीटीआयचं म्हणणं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

चंद्रकांत पाटलांना पहिल्यांदा चंपा कुणी म्हटलं? अनिल गोटेंनी जाहीर केलं ‘त्यांचं’ नाव

देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे

महत्वाच्या बातम्या-

…नाहीतर डोळे काढून घ्यायची क्षमता, नितीन गडकरींची चीनला धमकी

मुंबईकरांनो! लहान मुलांची काळजी घ्या; कोरोनाच्या ‘या’ नव्या लक्षणाचा धुमाकूळ

“…यात काही चुकत असेल तर तुम्हीच सांगा लबाड कोण?” तुकाराम मुंढेंचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या