Top News खेळ

देशात ‘पबजी’वर आजपासून पूर्णपणे बंदी, मोबाईलमध्ये गेम आता चालणार नाही

नवी दिल्ली | पबजी ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. आजपासून देशात पबजी मोबाईल गेम आणि पबजी मोबाईल लाइट पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे आता भारतात पबजी खेळता येणार नाहीये.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने 118 अॅप्सवर बंदी आणली होती. यामध्ये तरूणाईला भूरळ घालणाऱ्या पबजी गेमचा देखील समावेश होता. चीनकडून सुरक्षेचा धोका पाहता भारताने अॅपवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता.

भारतात पबजी पूर्णपणे बंद करत असल्याची माहिती कंपनीने फेसबुक पोस्टद्वारे दिलीये. “भारतातील पबजी मोबाइलला दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी. टेन्सेंन्ट गेमकडून आज भारतातील सेवा संपुष्टात आली,” असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

त्यामुळे आता जर तुम्ही मोबाईलमध्ये एपीके इन्स्टॉल केलं असेल तरीही आता पबजी गेम खेळता येणार नाही. सर्व प्रकाशित अधिकार पबजीच्या मालकांना परत करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ आरोपावरून भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

“बिहारमध्ये शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळं आहे का?”

अखिलेश यादव यांची भेट घेणारे 7 आमदार बसपामधून निलंबित

“उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा देणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते”

‘जान कुमार सानू तुला गर्व असायला हवा….’; जान कुमार सानूच्या समर्थनात धावली ‘ही’ अभिनेत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या